E-Paperhttps://jankalyannews24.live/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifदेशमहाराष्ट्र

सिंदेवाही तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीतील सरपंच पदाचे आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

सिंदेवाही :निवडणूक जवळ आली की गावपुढारी व जनतेचे लक्ष सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीवर लागलेले असते. तालुक्यातील 50 ग्रामपंचाययत च्या सन 2025 ते 2030 या कालावधी साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्गाचा प्रवर्ग, आणि खुला प्रवर्गातील महिलाकरिता सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक 23/4/2025 रोजी दुपारी 2.00 वाजता तहसील कार्यालय सिंदेवाही येथील सभागृहात घेण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र शासन (सरपंच व उपसरपंच )निवडणूक नियम 1964 च्या नियम 2-अ (1)(2)नुसार मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक./साशा /कार्या-12/टे -4/ग्रापनी /2025/279 दिनांक 4/4/2025 चे तालुका तहसील प्रशासनास प्राप्त पत्र दिनांक 15/4/2025 नुसार मा. संदीप पाणमंद तहसीलदार तहसील कार्यालय सिंदेवाही यांनी जाहीरनामा काढून तालुक्यातील प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी,ग्रामपंचायत /तलाठी यांना ग्रामपंचायत च्या नोटीस बॉर्डवर जाहिरनामा प्रसिद्ध करुन आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती/उपसभापती पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडती करीता तहसील कार्यालय येथील सभागृहात उपस्थितीत राहण्यास कळवण्यात यावे.व याबाबत अहवाल उलट टपाली तहसील कार्यालयास पाठवण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!